Saturday, 22 December 2018

चिरंतन आठवण _बैलगाडी


. बैलगाडी आता दुर्मीळ झाली. गावाकडे पूर्वी लांबून दिसणारी ही बैलगाडी, दुरापास्त झाली. गाडीची चाके पाटल्यादारी भिंतीला लावून ठेवली जायची. शेतक-यांची ही हक्काची गाडी होती आणि ही गाडी असणारा तेव्हाचा श्रीमंत, खानदानी असायचा. पूर्वी डांबरी रस्ताच नव्हता. बैलगाडीतून जाणे आणि प्रवासाचा आनंद घेणे फार आनंदाचे होते. आता फक्त गाडीची चाके आठवण म्हणून पाहायची एवढंच राहिलं. खेडोपाडय़ातली ही बैलगाडी रात्री-अपरात्री निघाली की, कोसावरून चालली तरी तिचा आवाज यायचा. गाडीला पुढे कंदील असायचे. आता ना बैलगाडी ना कंदील. या आठवणींचा आता *अँटीक पीस* म्हणून वापर होऊ लागला.* त्यातला जिवंतपणा संपला. या सर्व शेभेच्या वस्तू बनल्या. काही टक्के बैलगाडी शिल्लक आहे, तीही गरज म्हणून नव्हे तर आठवण म्हणून, घरच्या माणसांपेक्षा या प्राण्यांना जीव लावला तो फक्त ओझे ओढण्यासाठी नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून. कधी एखादा बैल आजारी पडला की, जीव कासावीस होणारा धनी आता दुर्मीळ झाला. *बैलगाडीची आठवण* चिरंतन राहते. जुने दिवस, जुन्या आठवणी कायम हृदयात राहतात, कारण ही शेतकर्‍यांची शान होती बैलगाडी.......

No comments: